
सामना प्रतिनिधी । चारठाणा
जिंतुर ते संभाजीनगर या महामार्गावरील चारठाणा येथून जवळच असलेल्या पिंप्री शिवारातील जोड पुलावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. घटनेनंतर अज्ञात वाहन पसार झाले आहे. दरम्यान याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारठाणा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
जिंतुर ते संभाजीनगर तालुक्यातील चारठाणा पासून जवळील पिंप्री शिवारातील मुख्य महामार्गावर जोड पुलाजवळ आज बुधवार, ११ जून रोजी दुपारी १.३० वाच्या सुमारास प्रसाद विनायक अंभुरे (३६, रा. वर्णा ता.जिंतूर)या दुचाकी चालकाला या महामार्गावर आज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने प्रसाद विनायक अंभुरे हे जागीच गतप्राण झाले.

































































