लघुशंकेसाठी मोटरमनने ट्रेन थांबविल्याचा व्हिडीओ व्हायरल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईची लाइफलाइन लोकल ट्रेनच्या एका मोटरमनने त्याला आलेल्या लघुशंकेसाठी ट्रेन थांबवून ट्रकमध्येच लघुशंका उरकल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

मध्य रेल्वेच्या उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यानच्या मोटरमनच्या लघुशंकेचा हा व्हिडीओ बुधवारी समाजमाध्यमांत खूपच व्हायरल झाला. त्यात आपल्याला वाटते मेगाब्लॉकमुळे ट्रेन लेट आहेत. खरे कारण हे आहे अशा टिपण्या करण्यात आल्या. या व्हिडीओला समाजमाध्यमांवर टाकल्याने मोटरमनना अशा बिकटप्रसंगी नैसर्गिक गरजेसाठी केबिनमध्ये तर सुविधा नसते. अडीच ते तीन हजार प्रवाशांची भरलेली लोकल सुरक्षितस्थळी नेणाऱ्या मोटरमनना कधी कधी अपवादात्मक परिस्थितीत सलग डय़ुटी दिली जाते. यासंदर्भात  प्रसाद पी. व्ही. नावाच्या  एका नेटधारकाने हा दोष मोटरमनचा नसून त्याला केबिनमध्ये टॉयलेट न पुरविणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा असल्याचे ट्विट केले आहे. एखाद्याचे ब्लॅडर फुल असेल तर त्याच्याजवळ अन्य पर्याय नसतो. हे नैसर्गिक असून मोटरमनना अत्यंत काळजीपूर्वक डय़ुटी बजावायची असते. कोणत्याही क्षुल्लक गोष्टीमुळे त्याचे लक्ष विचलित होता कामा नये. कारण त्यांना प्रवाशांना सुरक्षित न्यायचे असते, असे अमित वराडे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.