हर्षवर्धनने पहिल्याच प्रयत्नात सर केले माउंट एव्हरेस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एव्हरेस्ट शिखर सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. वसईच्या हर्षवर्धन जोशी या 25 वर्षीय तरुणाने पहिल्याच प्रयत्नात माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे.

हर्षवर्धन अनुभवी गिर्यारोहक आहे. व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या हर्षवर्धनचे मन नेहमीच गिर्यारोहणामध्ये होते. 2016मध्ये स्टॉक पंग्री (20 हजार फूट) शिखर त्याने एकटय़ाने सर केले होते. माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याचे ध्येय स्पष्ट होते आणि ते साध्य करण्यासाठी त्याने मागील काही महिने खडतर प्रशिक्षण घेतले. तयारीसाठी 5 महिन्यांहून अधिक काळ हिमालयांच्या विविध भागांमध्ये व्यतित केला. या प्रक्रियेदरम्यान प्रशिक्षण घेण्यासोबत 11 शिखरदेखील पार केले. रॉयल स्टॅग हा ब्रँड लोकांना स्वप्न पूर्ण करण्यास आणि जीवनात मोठी कामगिरी करण्यासाठी प्रेरित करतो. त्यांनीदेखील हर्षवर्धनच्या प्रयत्नाचे काwतुक करत त्याच्या कार्याला सलाम केला आहे.