बाबरी मशीद जादूने पडली का ? खासदार ओवेसींचा सवाल

आजचा दिवस हिंदुस्थानच्या न्यायव्यवस्थेचा काळा दिवस आहे अशी प्रतिक्रिया खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे. तसेच बाबरी मशीद ही काय जादूने पडली का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

सीबीआय कोर्टाने बाबरी पतनप्रकरणी सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. त्यावर ओवेसी म्हणाले की “9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता हा निकाल त्याच्या विरोधात आहे. आडवाणी यांनी जिथे जिथे रथयात्रा काढली तिथे तिथे दंगली झाल्या होता. उमा भारती यांनी एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड दो अशा घोषणा दिल्या होता.’’ जेव्हा मशीद पाडली गेली तेव्हा उमार भारती आणि आडवाणी मिठाई खात नव्हते का असे ओवेसी म्हणाले आहेत.

बाबरी पाडण्याचा कुठलाच कट नव्हता असे मत कोर्टाने नोंदवत सर्व आरोपींना दोषमुक्त केले आहे. त्यावर ओवेसी यांनी ‘मग मशीद काय जादूने पडली का?’ असा सवाल केला आहे.

ओवेसी यांनी एक ट्विटर वर शेर पोस्ट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ओवेसी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘वही कातिल वही मुनसिफ अदालत उसकी वो शाहिद, बहुत से फैसलों में अब तरफदारी भी होती है.”

आपली प्रतिक्रिया द्या