
विरोधकांना थेट भिडणारा शिवसेनेचा रोखठोक आवाज शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांची विशेष मुलाखत ‘आवाज कुणाचा… पॉडकास्ट शिवसेनेचा’ या पॉडकास्टवर गुरुवारी तसेच उद्या शुक्रवारी प्रसारित होणार आहे. शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी ही मुलाखत घेतली असून त्यातून खासदार राऊत यांचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडणार आहे.
‘आवाज कुणाचा, शिवसेनेचा’ या पॉडकास्टवर 10 आणि 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता खासदार संजय राऊत यांची ही विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांचा जीवन प्रवास, ‘सामना’, शिवसेनेतील त्यांचा सुरुवातीचा काळ, शिवसेनेच्या तीन पिढय़ांशी असलेलं नातं आणि तुरुंगातील अनुभव यावर राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. ‘विरोधकांना थेट भिडणारा शिवसेनेचा रोखठोक आवाज’ या शीर्षकाखाली हा भाग शिवसेनेच्या अधिकृत यूटय़ूब चॅनल https://www.youtube.com/@ShivSenaUBTOfficial वर प्रसारित होणार आहे.





























































