एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांसाठी सुरक्षेचे नियम जाहीर, आयोगाकडून देण्यात येणार सुरक्षा किट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. कोविड-१९ च्या पाश्र्वभूमीवर आयोगाने या परीक्षांना बसलेल्या उमेदवारांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना व नियम पुढीलप्रमाणे जाहीर केले आहेत. त्या नियमांचे पालन उमेदवारांना करावे लागणार आहे. परीक्षेच्या वेळी आयोगाच्या वतीनेही उमेदवारांना सुरक्षा किट पुरवण्यात येणार आहे.

-परीक्षाकेंद्रात प्रवेश करताना तीन पदरी कापडाचा मास्क घालवा.
– आयोगातर्पेâ प्रत्येक उमेदवाराला मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर असलेले किट देण्यात येईल.
– परीक्षेदरम्यान उमेदवारांना हात वेळोवेळी सॅनिटाईझ करावेत.
– ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास पर्यवेक्षकांना कळवणे बंधनकारक.
– ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करणे आवश्यक.
– जेवणाचा डबा, पाण्याची बाटली सोबत आणावी.
– दोन पेपरदरम्यानच्या वेळात केंद्राबाहेर जाण्यास मनाई.
– एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य वापरण्यास मनाई.
– सोशल डिस्टन्सिंगचे पालन अत्यावश्यक.
– कंटेनमेन्ट झोनमधील उमेदवारांचे परीक्षा केंद्र बदलल्यास त्याची माहिती आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात येईल. उमेदवाराला ते एसएमएसद्वारे कळवले जाईल.
– वापरलेले मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर पाऊच परीक्षा संपल्यानंतर केंद्रात उपलब्ध करून दिलेल्या कुंड्यांमध्येच टाकावेत.