एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यात ठिय्या आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत.

राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा. ही राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱया विद्यार्थी वर्गाची भावना आहे.पण याकडे राज्य सरकार आणि आयोग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून विद्यार्थ्यांनी ठिय्या दिला. काँग्रेस पक्षाचे प्रवत्ते अतुल लोंढे आणि काँग्रेस पक्षाचे सहकार प्रदेश सरचिटणीस बळीराम डोळे हे सकाळपासून विद्यार्थ्यांसोबत ठाण मांडून आहेत.