IPL 2020 – धोनीचे आयपीएलमधील अनोखे विक्रम, सातवा तर मोडणे अशक्य

कोरोना संकटकाळामुळे यंदा आयपीएलचा 13 मोसम यूएईमध्ये खेळला जाणार असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघात 19 सप्टेंबरला रंगणार आहे. धोनीचा संघ विजयाचा चौकार लगावण्यासाठी सज्ज असून जय्यत सराव सुरू आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपनंतर धोनी पहिल्यांदाच मैदानात उतरणार असून सर्वांची नजर त्याच्यावर असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलेल्या धोनीच्या नावावर आयपीलमध्ये खास विक्रम आहेत. या विक्रमांना सहजासहजी गवसणी घालणे शक्य नाही. जाणून घेऊया…

1. dhoni-11

आयपीएलमध्ये सर्वाधिक लढती मुंबई इंडियन्सने जिंकल्या असल्या तरी कर्णधार म्हणून सर्वाधिक 100 लढती जिंकण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. चेन्नईवर बंदीची कारवाई झाल्यानंतर धोनीने पुणे संघाचेही नेतृत्व केले होते.

IPL 2020 – आयपीएलमध्ये सर्वात जास्त संघाकडून खेळलेले 6 खेळाडू, एकाने तर 8 संघ बदलले

2. mahendra-singh-dhoni-stumpi

आयपीएलमध्ये सर्वाधिक यष्टीचीत करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर असून त्याने 38 वेळा अशी कामगिरी नोंदवली आहे. त्याखालोखाल कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक असून त्याच्या नावावर 30 यष्टीचीतची नोंद आहे.

Photo story – आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू

3. m-s-dhoni-stupping

यष्टीचीतसह यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स धोनीच्या नावावर आहेत. धोनीने आतापर्यंत यष्टीमागे 132 शिकार केल्या असून यात 94 झेल आणि 38 यष्टीचीतचा समावेश आहे.

4. dhoni-new-image

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा अंतिम लढत खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर असून त्याने 9 वेळा अंतिम लढत खेळली आहे. 8 लढती त्याने चेन्नई, तर 1 लढत पुण्याच्या संघात असताना खेळली आहे.

Photo – आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज

6. dhoni-5

आयपीएलमध्ये अखेरच्या (20 वी ओव्हर) षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने 2008 ते 2019या दरम्यान खेळताना 20 व्या षटकात सर्वाधिक 564 धावा केल्या असून 281 धावांसह मुंबईचा खेळाडू किरोन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर आहे.

6. dhoni-ipl2018

डेथ ओव्हरमध्ये (शेवटच्या 4 ओव्हर) 190.50 च्या सरासरीने 2206 धावा ठोकण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.

7. dhoni

संघाच्या सर्व प्रशिक्षकांचे कर्णधारपद भूषवण्याचा अनोखा विक्रम धोनीच्या नावावर आहे. सीएसकेचे प्रमुख प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी, फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी हे सर्व धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएल खेळले आहेत.

IPL 2020 – सावंतवाडीचो ‘झिल’ बॅटिने फटके मारतलो, केकेआरचो ‘नाईक’ गोलंदाजांचे कलम लावतलो

आपली प्रतिक्रिया द्या