IPL 2020 – सावंतवाडीचो ‘झिल’ बॅटिने फटके मारतलो, केकेआरचो ‘नाईक’ गोलंदाजांचे कलम लावतलो

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये यंदा पुन्हा एकदा कोकणचे वारे वाहणार आहे. मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील असणारा निखिल नाईक गोलंदाजांचे ‘कलम’ लावायला सज्ज आहे. सलग दुसऱ्यांदा निखिल नाईक दोन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्राच्या या तरुण खेळाडूवर सर्वांची नजर असणार आहे.

लहानपणापासून क्रिकेटचे धडे गिरवलेला निखिल धोनीने क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले तेव्हा 10 वर्षांचा होता. धोनीची फलंदाजी आणि यष्टीमागील चपळ खेळ पाहून निखिल प्रभावित झाले आणि त्यानेही यष्टीरक्षक फलंदाज बनण्याचा निर्णय घेतला. सावंतवाडी येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा गाजवल्यावर त्याने एक स्थानिक क्लब जॉईन केला. त्याच्या आक्रमक फलंदाजीची भुरळ पडल्याने महाराष्ट्राच्या अंडर-15 संघात त्याची निवड झाली.

IPL गाजवणारे 5 दिग्गज खेळाडू राहिले यंदा ‘अनसोल्ड’, तिसरे नाव वाचून विश्वास बसणार नाही

याच दरम्यान, निखिलच्या आईचे निधन झाले, मात्र वडिलांनी त्यांना चांगला खेळाडू बनवण्यासाठी जीवाचे रान केले. विकेटमागे चपळ खेळ आणि आक्रमक फलंदाजी असा दुहेरी खेळ दाखवणाऱ्या निखिलची विजय हजारे ट्रॉफीसाठी 2014 ला महाराष्ट्राच्या संघात वर्णी लागली. पहिल्याच स्पर्धेत त्याने 4 लढतीत 58.50 च्या सरासरीने 234 धावा केल्या. त्याची ही कामगिरी पाहून 2016 ला किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर खरेदी केले.

IPL 2020 – कार्तिकच्या हाती कमान, रसेल फोडणार गोलंदाजांना घाम; केकेआर तिसऱ्या विजेतेपदासाठी तयार

आयपीएलमध्ये पोहोचलेल्या निखिल नाईकला पंजाबकडून फक्त 2 सामने खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने 22 धावा केल्या. आयपीएलनंतर निखिल महाराष्ट्राच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित सदस्य झाला. 2017 आणि 2018 ला तो अनसोल्ड राहिला. मात्र 2019 ला आयपीएलच्या 12 व्या मोसमात कोलकाताच्या संघाने पर्यायी यष्टीरक्षक म्हणून खरेदी केले. त्याच्या आक्रमक अंदाजामुळे त्याला ‘इंडियन रसेल’ असेही म्हटले जाते.

images-3

आयपीएलमध्ये निवड झाल्याचा आनंद निखिलने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत 11 लढतीत 64.33 च्या सरासरीने 194 धावा करत साजरा केला. रेल्वे विरुद्धच्या लढतीत निखिलने 58 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांची आतिषबाजी करत 95 धावा केल्या. यादरम्यान त्याने दिग्गज फिरकीपटू अमित मिश्रा याला सलग 5 षटकार ठोकले होते. आता 2020 च्या आयपीएल स्पर्धेत केकेआर कडून तुफानी फलंदाजी करण्यास कोकणचा ‘झिल’ तयार आहे.

बीडच्या अंबाजोगाई येथील ‘कलाकार’ IPL गाजवण्यासाठी सज्ज, गतविजेत्या मुंबईच्या संघात समावेश

आपली प्रतिक्रिया द्या