आषाढीसाठी एसटीच्या साडेपाच हजार बसेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱयांच्या सेवेसाठी एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱया भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या वतीने 5500 विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत.

राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. विशेष म्हणजे या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत.

एकादशीच्या दिवशी लाखो भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीचे 36 हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलीस प्रशासनासोबत कार्यरत राहणार आहेत.