
लघू आणि सुक्ष्म उद्योगांना मदत करण्यात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुद्रा लोन योजना एनपीएच्या दलदलीत फसल्याची स्पष्ट कबुली केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत दिली. या योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या कर्जापैकी पाच टक्के कर्ज बुडीत खात्यात जमा झाल्याचे ते म्हणाले.
2015 मध्ये देशातील लघू व सुक्ष्म उद्योगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा लोन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केले. मात्र कर्ज परताव्याचे प्रमाण दिवसागणिक घटू लागले. 2017-18 मध्ये मुद्रा लोन एनपीएमध्ये जाण्याचे प्रमाण 3.4 टक्के होते. 2018-19 मध्ये हे प्रमाण 3.8 टक्क्यांवर आले. 2019-20 मध्ये यात तब्बल दीड टक्क्यांनी वाढ झाली, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

























































