मुळा धरणाची जलपातळी सव्वातीन फूटांनी वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 18 तासात राहुरीच्या मुळा धरणाची पाणीपातळी सव्वा तीन फुटाने वाढली आहे. या काळात 611 दशलक्ष घनफूट पाणी धरणात जमा झाले आहे.

रविवारी सायंकाळी मुळा धरणाच्या बॅकवॉटरला कोतुळचे पाणी येवुन भिडले होते.मात्र, प्रत्यक्षात मुळा धरणात रविवारी रात्री १२ वाजता नवीन पाणी दाखल झाले. सोमवारी सायंकाळी 6 वाजता धरणातील पाण्याची पातळी 1756.20 तर धरणाचा पाणीसाठा 5 हजार 313 दशलक्ष घनफुट झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी मुळा धरणात 5 हजार 416 दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली होती. हरिश्चंद्र गडाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस मंदावल्याने सोमवारी सकाळी 6 वाजता कोतुळकडून मुळा धरणाकडे 5 हजार 638 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. दुपारी 12 वाजता 3 हजार 416 तर सायंकाळी 6 वाजता 3 हजार 212 क्युसेकने आवक स्थिर झाली. मागील वर्षी 1 जुलैला मुळा धरणात नवीन पाणी दाखल होऊन आजच्या दिवशी कोतुळकडून मुळा धरणात 1230 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. यंदा 7 जुलैला रात्री 12 वाजता पाणी दाखल होऊन ही मागील वर्षीच्या पाणी साठ्याची पातळी ओलांडली आहे.