
कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून देशभरातील थिएटर बंद आहेत. याकाळात मल्टिप्लेक्सचालकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने दिली आहे. थिएटर मालकांचे नुकसान टाळण्यासाठी आणि मल्टिप्लेक्सवर अकलंबून असलेल्या लाखो लोकांचे रोजगार वाचविण्यासाठी लवकरात लवकर थिएटर सुरू करण्याची मागणी असोसिएशनच्यावतीने केंद्र सरकारला करण्यात आली आहे.
Joy of watching stories unfold on the big screen: the clapping, laughing and tears. We miss it. Can’t wait to have you back at the movies!#UnlockCinemaSaveJobs pic.twitter.com/ViB9P8dOly
— Multiplex Association Of India (@MAofIndia) September 15, 2020
मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया ही देशभरातील मल्टिप्लेक्स चैनचे नेतृत्व करणारी संघटना आहे. मार्च महिन्यापासून देशभरातील 10 हजार थिएटर बंद असल्याने मल्टिप्लेक्स चालक, निर्माते यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनलॉक 5 मध्ये तरी थिएटर सुरू होणार का ? याकडे मल्टिप्लेक्स चालकांचे डोळे लागले आहेत. ‘थिएटर बंद असल्याने दरमहा दीड हजार कोटी रुपयांप्रमाणे सहा महिन्यांत आमचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. युके, फ्रान्स, स्पेन अशा 84 देशांत सुरक्षिततेची काळजी घेऊन थिएटर पुन्हा सुरू झाले आहेत. हिंदुस्थानात देखील पुन्हा थिएटर सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
























































