मुंबईत 30 टक्के नालेसफाई पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना वाढत असल्यामुळे पालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असताना पावसाळापूर्व कामेही वेगाने सुरू आहेत. या वर्षी महिनाभर आधीच नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 30 टक्के कामही पूर्ण झाले आहे. यामध्ये शहरात 24.24 टक्के, पूर्व उपनगरात 35.86 टक्के आणि पश्चिम उपनगरात 28.18 टक्के अशी एकूण 30.08 टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली.

मुंबईत गेल्या वर्षभरापासून पालिका कोरोना रोखण्यासाठी झटत आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करीत आहे. या कामाबरोबरच पालिकेने गेल्या वर्षी निर्धारित उद्दिष्टापेक्षा 100 टक्क्यांहून जास्त नालेसफाई केली होती. दरवर्षी नालेसफाई 10 एप्रिलला सुरू केली जाते. मात्र या वर्षी महिनाभर आधी म्हणजे मार्चच्या पहिल्याच आठवडय़ात नालेसफाई सुरू करण्यात आली आहे.

मिठीसाठी नवे तंत्रज्ञान

अतिवृष्टीत शहरात पाणी शिरून होणारी गैरसोय टाळण्यासाठी मिठी नदीचा गाळ काढण्यासाठी या वर्षी नवे परदेशी तंत्रज्ञान वापरले जात आहे. नेदरलॅण्डची टक्शर एम्फिबिअस मशीनचा वापर करण्यात येत आहे.