मुंबईत 50 हजार चाचण्या, 5 हजार बाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आठवडाभर स्थिरावलेली दैनंदिन कोरोना रुग्ण संख्या आता आणखी खाली आली आहे. गेल्या 24 तासांत 50 हजार 32 चाचण्या करण्यात आल्या असून यात 5008 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज एकाच दिवसात 12 हजार 913 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर नव्या रुग्णांमधील 420 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 88 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. दरम्यान, रुग्ण संख्या घटू लागल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सद्यस्थितीत 14 हजार 178 सक्रिय रुग्ण आहेत.