
सामना प्रतिनिधी । मुंबई
वरळी सी-लिंकजवळील खड्ड्यात पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. बबलू कुमार पासवान (12) असे या मुलाचे नाव आहे.
बबलू हा दुपारी 1.20 च्या सुमारास वरळी येथील खड्ड्यात पडला. ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला बाहेर काढून शीव रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान, बबलू या ठिकाणी नेमका कोणत्या कारणासाठी आला होता याचा शोध सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.






























































