
केंद्रीयमंत्री नारायण राणे हे आज अजित पवार यांच्या वक्तव्यावर घसरले. अजित पवार अज्ञानी आहेत अशी टीका करतानाच अजून मी राष्ट्रवादीवडे कळलेलो नाही. त्यांनी त्यांच्या खात्याचे पाहाके, असा अनाहूत सल्लादेखील द्यायला नारायण राणे विसरले नाहीत.
भाजपच्या जन आशीर्काद यात्रेचा शेवट सिंधुदुर्ग येथे झाल्यानंतर पत्रकारांनी नारायण राणे यांना अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले. सुक्ष्म आणि लघु खात्याकडून राज्याला काय मिळणार या अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना राणे यांनी अजित पवार अज्ञानी असल्याचे विधान केले. आपल्यावरील आरोप आणि केसेस कशा काढून घ्यायच्या हे अजित पवार यांच्याकडून शिकावे, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, नारायण राणे यांच्या या टीकेवर अजित पवार यांनीही उत्तर दिले असून त्यांना त्यांचे लखलाभ होऊ द्या. आम्हाला आमचे सरकार व्यवस्थितपणे चालकायचे आहे. ते केंद्रीय मंत्री आहेत. तेव्हा त्यांनी केंद्रात काम करावं, आम्हाला आमच्या राज्याचे काम करू द्या, असे अजित पवार म्हणाले.































































