
मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस – कोइम्बतूर एक्स्प्रेसच्या पारंपारिक रेकचे एलएचबी रेकमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. 11013 लोकमान्य टिळक टर्मिनस – कोइम्बतूर एक्स्प्रेस 25 नोव्हेंबर 2022 पासून एलएचबी डब्यांसह चालविण्यात येणार आहे. तसेच 11014 कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 27 नोव्हेंबर 2022 पासून एलएचबी डब्यांसह चालविण्यात येणार आहे.
एक प्रथम वातानुकूलित, चार द्वितीय वातानुकूलित, 10 तृतीय वातानुकूलित, 2 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन, एक पँट्री कार आणि एक जनरेटर कार अशी गाडीची संरचना असेल. 25 नोव्हेंबर 2022 पासून सुटणाऱ्या ट्रेन क्र. 11013 चे बुकिंग 11 ऑक्टोबर 2022 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि https://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.































































