
उत्तरेत गेले दोन महिने सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे आणि काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या शीतलहरींमुळे मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका आणि गार वाऱयाचे प्रमाण वाढले आहे. एरव्ही 17 अंश सेल्सिअसचा पल्लाही गाठू न शकणाऱया मुंबईने रविवारी पहाटे 13.8 अंश सेल्सिअसचा पल्ला गाठल्याने मुंबईला हुडहुडी भरली.
उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा वाढलेला कडाका आणि शीतलहरींमुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून अतिथंड वाऱयामुळे मुंबईकरांवर अक्षरशः हुडहुडी भरली. रविवारी पहाटे सांताक्रूझ येथे 13.8 तर कुलाबा येथे 16.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. या मोसमातील हे सर्वाधिक नीचांकी तापमान आहे.
मुंबईचा पारा 10 अंशापर्यंत घसरणार
राज्यातील सर्वच भागांत थंडीचा जोर वाढणार असून पुढील दोन आठवडे विक्रमी थंडी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत तापमानात घट होणार असून मुंबईचा पारा 10 अंशांच्या खाली घसरण्याची शक्यताही हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. दरम्यान, थंडी आणि हवेतील प्रदूषणामुळे आधीच सर्दी, खोकल्याने त्रासलेले मुंबईकर वाढत्या थंडीमुळे अधिकच बेजार होण्याची शक्यता आहे.
ठाण्यात पारा 16 अंशावर
गेल्या तीन दिवसांपासून ठाणेकरही गारठले असून पारा 16 अंशावर आला आहे, मात्र अजून शहरात शेकोटय़ा फारशा दिसत नसल्या तरी स्केटर, कानटोपी, मफलर, हातमोजे घालून ठाणेकर बाहेर फिरताना दिसत आहेत. शनिकारी रात्री साडेआठ ते साडेनऊ काजण्याच्या सुमारास पारा 20.4 अंश सेल्सिअस होता. तो पारा हळूहळू खाली येऊ लागला. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तर तो 16.2 अंश सेल्सिअसवर घसरला होता. हवेत पसरलेल्या गारव्याचा ठाणेकर पुरेपूर आनंद घेत असून थंडीचा कडाका वाढून पारा आणखी खाली येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.





























































