मेमध्ये मोठा दिलासा! वीस दिवसांत डबलिंग दुप्पट, मृत्यू निम्म्यावर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता चांगलीच नियंत्रणात आली असून मे महिन्यात कोरोना स्थितीत मोठा सकारात्मक बदल झाला आहे. वीस दिवसांत रुग्ण दुपटीच्या कालावधीने 163 दिवसांवरून एका वर्षाचा कालावधी पार करीत 370 दिवसांचा टप्पा पार केला आहे. तर दररोज होणाऱया 60 ते 70 मृत्यूचे प्रमाणही 30 पर्यंत खाली आहे. त्यामुळे मुंबईला मे महिन्यामध्ये मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत कोरोनाच्या दुसऱया लाटेत झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढल्याने पालिकेचे आव्हान वाढले होते. मात्र पालिकेने वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे दैनंदिन रुग्णसंख्येसह कोरोनाची संपूर्ण स्थितीच नियंत्रणात आली आहे. पालिकेने कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी दैनंदिन चांचण्यांचे प्रमाण 25 हजारांवरून थेट दुप्पट करीत 50 हजार केले. यामध्ये मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळले तरी पालिकेने रुग्णांवर प्रभावी उपचार, क्वारंटाइन अशा व्यवस्था केल्याने दुसरी लाटही आता आटोक्यात आली आहे.

अशी झाली सुधारणा

मुंबईत 10 मे रोजी रुग्णवाढीचा दर तब्बल 0.41 टक्के होता. हा झपाटय़ाने कमी होऊन 28 मे रोजी रुग्णवाढीचा दर 0.18 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. n रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून 94 टक्के झाले आहे. हेच प्रमाण 10 मे रोजी 91 टक्के होते. यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या वाढल्याने सद्यस्थितीत केवळ सुमारे 28 हजार सक्रिय रुग्ण आहेत. n सक्रिय रुग्णांपैकी सुमारे 20 हजार रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.

दिनांक डबलिंग रेट मृत्यू

  • 10 मे 163 दिवस 74
  • 11 मे 170 दिवस 51
  • 12 मे 176 दिवस 66
  • 13 मे 189 दिवस 68
  • 14 मे 199 दिवस 62
  • 15 मे 213 दिवस 62
  • 23 मे 331 दिवस 49
  • 24 मे 334 दिवस 48
  • 25 मे 345 दिवस 37
  • 26 मे 348 दिवस 34
  • 27 मे 351 दिवस 36
  • 28 मे 370 दिवस 30