
कोरोनाच्या दुसऱया लाटेत मृत्युदर घटल्याचे समाधानकारक चित्र असले तरी दैनंदिन बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. कोरोना मुंबईत येऊन वर्ष उलटले असले तरी गेल्या 71 दिवसांत एकूण रुग्णसंख्येच्या 46 टक्के रुग्ण आढळले आहेत. 11 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत 3 लाख 13 हजार रुग्ण आढळले. मात्र 12 फेब्रुवारीपासून 20 एप्रिलपर्यंत मुंबईत 2 लाख 73 हजार हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी 11 मार्च रोजी मुंबईत पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर वर्षभराच्या लढय़ानंतर जानेवारीअखेरीस कोरोना चांगलाच आटोक्यात आला. मात्र यानंतर फेब्रुवारीच्या मध्यावर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत गेली. मार्चच्या दुसऱया आठवडय़ापासून ही अधिक वेगाने होऊ लागली. सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट स्थिरावली असली तरी गेल्या 70 दिवसांत एकूण रुग्णसंख्येच्या 46 टक्के रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 12 हजार 347 जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेक द चेन
बुधवारची रुग्णसंख्या
- राज्य – रुग्ण 67468
मृत्यू – 568 - मुंबई रुग्ण- 7684 , मृत्यू ६२
- ठाणे – 1,343
- नाशिक – 4,469
- पुणे – 5,538
- संभाजीनगर – 588
- नागपूर – 5,160
- नवी मुंबई – 961
- डोंबिवली – 1,231
- पनवेल – 898
- नगर – 2,096
























































