
‘आमचं जमलंय… यंदा कर्तव्य आहे!’ या खुशीत ‘लगीनघाई’ सुरू केलेल्या वधू-वरांच्या कुटुंबियांच्या आनंदावर कोरोनाने विरजण पाडले आहे. लग्नाचा मुहूर्त महिनाभरावर येऊन ठेपला असतानाच देशात कोरोनाने डोके वर काढल्यामुळे वधू-वरांनी आपल्या लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलले आहेत. लग्नाच्या शुभकार्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी ते एप्रिल-मेच्या मुहूर्तांपासून ‘सावधान’ राहिले आहेत.
पुण्यापाठोपाठ मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे शहरातील वधू-वरांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. कोणतेही गर्दीचे कार्यक्रम आयोजित करू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर लग्नघरात कुटुंबियांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. नातेवाईक, मित्रमंडळींना कल्पना देऊन लग्नमुहूर्त पुढे ढकलण्याबाबत कुटुंबियांमध्ये एकमत होऊ लागले आहे. आपल्या लग्नाच्या शुभकार्यात इतरांना कसली बाधा होऊ नये म्हणून वधू-वरांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. घाटकोपरच्या विशाल शिंदे व जोगेश्वरीच्या अश्विनी काटे यांनी मे महिन्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनामुळे लग्न पुढे ढकलल्याचे दोघांनी सांगितले. दादरच्या धुरू हॉलचे मनोहर साळवी यांनीही कोरोनाच्या परिणामाबाबत चिंता व्यक्त केली.
कोरोनाच्या धसक्यामुळे हॉल बुकिंगसाठी येणारे लोक कमी झाले आहेत. गेल्या कर्षीच्या तुलनेत यंदा लग्नाचे अनेक मुहूर्त असतानाही बुकिंगला कमी प्रतिसाद आहे. एरक्ही आमच्याकडे साखरपुडा, काढदिकस तसेच इतर कार्यक्रम होतात. कोरोनामुळे ते कार्यक्रमसुद्धा रद्द होऊ लागले आहेत. – अजित बोरकर, कनिता समाज हॉल, दादर
आमच्याकडे दरवर्षी मार्चमध्ये अनेक लोकांची बुकिंगसाठी ये-जा सुरू असते. यंदा कोरोनाच्या भीतीने बुकिंगला लोक येईनासे झाले आहेत. किंबहुना, काही जण याआधी केलेले बुकिंग रद्द करण्याच्या विचारात आहेत. अनेकांनी एप्रिल-मे महिन्यातील मुहूर्त टाळून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. – अमित माळकर, मांगल्य मंगल हॉल, जोगेश्वरी

































































