मुंबईकर क्रिकेटपटूंची दिवाळी, दोन मोसमांतील मानधन मिळाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकर क्रिकेटपटूंना ऐन दिवाळीत गोड बातमी मिळाली. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) 2016-17, 2017-18 या मोसमांतील मुंबईकर क्रिकेटपटूंचे मानधन देण्यात आले. दोन वर्षांचे 90 लाख रुपये यावेळी प्रदान करण्यात आले. मुंबईचा पुरुषांचा सीनियर संघ, महिलांचा सीनियर संघ व अंडर 23 या संघातील खेळाडूंना हे मानधन देण्यात येणार आहे.

एनईसीसीकडून स्पॉन्सर्सशिप

नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी (एनईसीसी) यांच्याकडून एमसीएला 75 लाख रुपये स्पॉन्सर्सशिपचे मिळतात. या कंपनीचा लोगो मुंबई संघातील क्रिकेटपटूंच्या जर्सीवर लावण्यात येतो. या रुपयांमधील 45 लाख रुपये खेळाडूंना देण्यात आले आहेत.

ज्युनियर खेळाडूंनाही मानधन मिळण्याची शक्यता

यावेळी सीनियरप्रमाणे मुंबईच्या ज्युनियर क्रिकेटपटूंनाही मानधन मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार स्कॉलरशिपमधील रक्कम ज्युनियर क्रिकेटपटूंसाठी वापरण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.

उरलेल्या दोन मोसमांतील मानधनही लवकरच मिळेल

एमसीएकडून 2016-17, 2017-18 या मोसमांतील मानधन क्रिकेटपटूंना देण्यात आले आहे. पण 2018-19 व 2019-20 या सालांतील मानधनही लवकरात लवकर देण्यात येण्याची शक्यता सूत्रांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.