बाथरूममध्ये पडून आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. घडल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

मृत मुलगा हा गोरेगावच्या मेघ मल्हार संकुलात राहत होता. गेल्या आठवडय़ात तो आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. तेव्हा त्याचा पाय घसरून तो खाली पडला. त्याने सावरण्यासाठी वॉश बेसिनला पकडले. तेव्हा वॉश बेसिन मुलाच्या अंगावर पडून एक तुकडा त्याच्या गळ्यावर पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. मुलाला त्याच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घडल्या प्रकाराची माहिती समजताच दिंडोशी पोलीस घटनास्थळी गेले. दिंडोशी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात काही संशयास्पद आढळून आले नाही. दिंडोशी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.