शेतकऱयांना पीक विमा भरपाई 31 जुलैपर्यंत देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

ज्या शेतकऱयांना अद्याप पीक विमा भरपाई मिळालेली नाही अशा सर्व शेतकऱयांना येत्या 31 जुलैपर्यंत लाभ देण्याचे आश्वासन आयसीआयसीआय लोम्बार्डच्या वतीने शिवसेनेला देण्यात आले. शेतकऱयांच्या पीक विमा भरपाईबाबत बुधवारी शिवसेनेतर्फे आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्सवर मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेच्या दणक्याने कंपनीचे अधिकारी हादरून गेले. कंपनीतर्फे ‘प्रधानमंत्री फसल विमा योजने’अंतर्गत 2016-17 आणि 2017-18 तसेच 18-19 साठी हिंगोली, जालना, अकोला, चंद्रपूर, जळगाव, नंदुरबार जिह्यातील किती शेतकऱयांनी विमा प्रीमियम भरलेला आहे ? त्यापैकी किती शेतकऱयांना कंपनीकडून विमा भरपाई देण्यात आली? किती शेतकऱयांना अद्याप भरपाई देण्यात आली नाही ? त्याची कारणे काय अशा अनेक प्रश्नांबाबत जाब शिवसेनेच्या वतीने कंपनीच्या अधिकाऱयांना विचारण्यात आला. शेतकऱयांच्या पीक विम्याचे 34 कोटी आठ दिवसांत देण्यात येतील, अशी हमीही अधिकाऱयांनी दिली.

शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, विभागप्रमुख-आमदार सदा सरवणकर आणि विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स कंपनीवर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. शेतकऱयांना देण्यात आलेली भरपाई, कधीपर्यंत देणार याबाबतची सर्व माहिती प्रत्येक वर्षासाठी वेगळी अशी लेखी स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मूल्य एक हजार रुपयांहून कमी असलेले किती शेतकरी आहेत आणि त्यासाठी आपले प्रयत्न तसेच कार्यवाही चालू असलेल्या किती शेतकऱयांबाबत कार्यवाही पूर्ण झालेली आहे, ज्या शेतकऱयांना अद्याप विम्याचा लाभ मिळालेली नाही त्याची नेमकी कारणे काय, याबाबतही अधिकाऱयांना विचारण्यात आले. येत्या आठ दिवसांत कंपनीने उर्वरित शेतकऱयांना पीक विम्याची भरपाई दिली नाही तर शिवसेना स्टाइलने त्यांना जाब विचारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी आमदार सुनील शिंदे, आमदार अजय चौधरी, उपमहापौर हेमांगी वरळीकर, माजी महापौर-नगरसेविका श्रद्धा जाधव, महिला विभाग संघटक किशोरी पेडणेकर इत्यादी उपस्थित होते.