देशातील सर्व खलाशांचे ‘न्यूसी’मार्फत मोफत लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या आयात-निर्यातीमध्ये व अत्यावश्यक वस्तूंच्या मालवाहतुकीमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱया मालवाहू जहाजांवरील सर्व नाविकांचे नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया (न्यूसी) या नाविकांच्या संघटनेच्या वतीने मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. देशातील असंख्य लोक व्यापारी-मालवाहू जहाजांवर नोकरी करतात. त्यामुळे नाविकांची लसीकरण मोहीम ही त्यांच्या नोकरीशी निगडित आहे. नाविकांचे लसीकरण न झाल्यास परदेशातील नाविक देशातील नाविकांच्या नोकऱ्या हिसकावून घेऊ शकतात. त्यामुळे देशातील नाविकांना लस उपलब्ध व्हावी, त्यांची नोकरी टिकावी यासाठी न्यूसीचे सरचिटणीस अब्दुलगनी सेरंग यांनी देशातील लाखो नाविकांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानंतर आता ‘न्यूसी’ने देशातील सर्व नाविकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. जहाजांवरील अधिकारी ते कनिष्ठ पदावरील सर्व नाविकांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या लसीकरणाचा सर्व खर्च ‘न्यूसी’च्या वतीने सामाजिक जबाबदारी या योजनेअंतर्गत उचलणार असल्याची माहिती ‘न्यूसी’चे असिस्टंट जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी दिली.