
सामना प्रतिनिधी। मुंबई
देशातील वाढती असहिष्णुता, सामाजिक वातावरण बिघडवणारी हिंसा आणि वाढलेले मॉरल पोलिसिंग देशाच्या विकासाला घातक आहे. या वातावरणामुळे देशाची आर्थिक उन्नती होण्याऐवजी अधोगती होईल, अशी भीती शनिवारी गोदरेज ग्रूपचे चेअरमन आदी गोदरेज यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.
देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे, त्याबाबत आदी गोदरेज यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. त्याबरोबरच देशात सर्वकाही ठाकठीक चाललेले नाही, सामाजिक अशांतता वाढत चालली असून ती देशाच्या प्रगतीमध्ये अडसर ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.


























































