
एखादी वस्तू किंवा पारपत्र, चेकबुक, परवाना आदी महत्त्काचे दस्ताऐवज हरविल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येणाऱयांना प्रमाणपत्र देण्याकरिता ऍफेडेव्हिटची मागणी करू नका. थेट प्रमाणपत्र द्या असे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज दिले. अशा ऍफेडेव्हिटची मागणी करत तक्रारदारांची अडवणूक केल्यास संबंधितावर खातेनिहाय कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
एखादी वस्तू अथवा महत्त्वाचा दस्तावेज हरविल्यास नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जातात. तेव्हा ठाणे अंमलदार संबंधितांकडे कस्तू किंवा कागदपत्र गहाळ झाल्याबाबत नोटरीकडून शपथपत्र आणण्यास सांगतात क त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यास नकार देतात. हे प्रकार वाढू लागल्याने आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. हरविलेल्या कागदपत्राची तक्रार देण्यासाठी शपथपत्र घेण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही. ठाणे अंमलदारांकडून होणारा हा प्रकार आक्षेपार्ह आहे अशी नाराजी व्यक्त करीत आयुक्तांनी शपथपत्राची मागणी करण्याचे तत्काळ थांबवा. प्रमाणपत्र देण्याकरिता नागरिकांची शपथपत्राच्या नाकाने विनाकारण अडवणूक करू नका. यापुढे कोणी अंमलदाराने असा प्रकार केल्याचे आढळून आल्यास त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.




























































