रानू मंडलनंतर मेकअपवरून मलाईका झाली ट्रोल

690

सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार सिंगर झालेल्या रानू मंडलला काही दिवसांपूर्वी हेवी मेकअपमुळे यूजर्सनी ट्रोल केले. पण आता अभिनेत्री व मॉडेल असलेली मलाईका अरोरा अशाच विचित्र मेकअपमुळे ट्रोल झाली आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेली मलाईका नेहमी तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. पण यात तिचा मेकअप बऱ्याच जणांना भडक वाटल्याने तिला ट्रोल करण्यात येत आहे. तर काहीजणांनी तिच्या मेकअपची तारीफ केली आहे.

काही यूजर्सनी तिला सुंदर दिसतेस असं म्हटले आहे. तर काहीजणांनी तिच्यावर टीका केली आहे. तुझ आता वय झालं आहे. असेही काहीजणांनी म्हटलं. तर काही जणांनी मजेशीर मीम्सही बनवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या