
श्रद्धा वालकर हत्येने खळबळ उडवल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीपीओमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणाने आपल्या प्रेयसीला पाण्याच्या टाकीत ढकलून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना दहिसर चेकनाक्याला बेलेझा इमारतीत घडली असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले आहे. तरुणीही कॉल सेंटरमध्ये काम करत होती.
अमेय दरेकर असे आरोपीचे नाव आहे. अमेय दरेकर आणि प्रियांगी सिंग यांचे प्रेमसंबंध होते. अमेय दरेकरने सांगितले की, प्रियांगी 15 मजल्याच्या इमारतीवरुन 18 फुटाच्या पाण्याच्या टाकीत पडली. त्यात ती गंभीर जखमी झाली. अमेय बोरीवरलीत राहत असून तो बीपीओमध्ये नोकरी करतो. त्याला न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपीचा मित्र देवेश लाड याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले ते दोघंही त्या दिवशी त्याच्या घरी भेटायला आले होते. डीसीपी स्मिता पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविण पाटील, इन्स्पेक्टर राम पोटे, सहाय्यक पोलीस विजेंद्र वाघमारे आणि अन्य पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मालाड येथे राहत असलेली प्रियांगी शनिवारी ऑफीसमध्ये काम असल्याचे सांगत घरातून बाहेर पडली. पोलीसांना दरेकर याने सांगितले की ती बोरीवलीला काजूपाड्याला गेली आणि तिथून त्याला फोन करुन नोकरीवरुन काढून टाकल्याचे सांगितले. त्यानंतर दोघं भेटले आणि देवेशच्या टेरेसवर पार्टी केली. रात्री नऊ वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत दारु पीत होते. दारु संपल्यानंतर मित्रा झोपण्यासाटी प्लॅटमध्ये गेला. प्रियांगी आणि अमेय टेरिसवरील पाण्याच्या टीकावर बसले होते. थोड्यावेळानंतर अचानक प्रियांगी टाकीवरुन खाली पडली. तिला गंभीर दुखापत झाली.
प्रियांगीला दुखापत झाल्यानंतर तिला रुग्णालयात न नेता अमेयने तिला घरी नेलं. त्याच्या आई वडिलांनीही तिला सकाळी सात वाजता तिच्या घरी सोडून निघून गेले. प्रियांगीच्या आईवडिलांनी तिला रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यावर तात्काळ रुग्णालयात दाखल केले. अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात प्रियांगीवर उपचार सुरु आहेत. दहिसर पोलिसांनी आरोपी प्रियकर अमेयला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. दिल्लीमध्ये श्रद्धाबरोबर जे झालं ते प्रियांगीबरोबर करण्याचा अमेयचा कट होता, असा आरोप प्रियांगीच्या कुटुंबियांनी केला आहे.
“प्रियांगी आणि दरेकर शाळेपासून एकमेकांना ओळखतात. दरेकर तीन महिन्यांपूर्वी बीपीओमध्ये नोकरीला लागला होता. मात्र त्यांच्यात वारंवार भांडण होत होते. पण यावेळी यावेळी मर्यादा ओलांडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी ला बेलेझाकडे टेरेस का लॉक केली नव्हते याची चौकशी केली. “सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले की आग लागल्यास सुरक्षेसाठी टेरेसचा दरवाजा उघडा ठेवला जात असल्याचे पोलिसांना सांगितले.






























































