Mumbai News – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई, गांजा तस्करीप्रकरणी प्रवाशाला अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने गांजा तस्करीचा डाव उधळून लावत एका प्रवाशाला अटक केली आहे. अटक प्रवाशाकडून 12 कोटी रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. सदर प्रवासी क्वालालंपूरहून मुंबईत आला होता. पुढील तपास सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रवासी मलेशिया एअरलाइन्सच्या विमान MH194 ने मंगळवारी मुंबई विमानतळावर उतरला. त्याच्या सामानाची तपासणी करताना अधिकाऱ्यांनी ट्रॉली बॅगमध्ये लपवून ठेवलेला 12.26 किलो गांजा जप्त केला. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे सुमारे 12.26 कोटी रुपये आहे. आरोपी प्रवाशाला तात्काळ नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.