नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचा पोलिसांकडून तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Nupur-Sharma

भाजपच्या नूपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नूपुर यांनी आक्षेपार्ह विधान ज्या कार्यक्रमात केले होते त्याचा व्हिडीओ पोलिसांनी संबंधित न्यूज चॅनेलकडे मागितला असल्याचे सूत्रांकडून समजते.

एका न्यूज चॅनेलवरील कार्यक्रमात नूपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत संतापजनक टिपण्णी केली होती. त्यानंतर त्याचे संतप्त पडसाद सर्वत्र उमटले. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठण्यात नूपुर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पायधुनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अद्यापपर्यंत नूपुर शर्मा यांना कोणतेही समन्स बजावण्यात आलेले नाही. मात्र त्यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याचा व्हिडीओ संबंधित न्यूज चॅनेलकडे मागितला असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, जबाब नोंदविण्यासाठी नूपुर शर्मा यांना बोलावले जाईल असेही सांगण्यात आले.