कुलाब्याजवळ अरबी समुद्रात थरार; बोटीवरील आठ जणांना पोलिसांनी वाचवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरबी समुद्रात कुलाबा येथील लाइटहाऊसजवळ बुधवारी एक थरारक घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे ‘विनायक’ ही मासेमारी नौका भरसमुद्रात बुडू लागली. बोटीवरील तांडेल व खलाशी असे आठ जण समुद्रात बुडत असतानाच यलो गेट पोलिसांची ‘मुंबई’ ही नौका घटनास्थळी पोहचली. नौकेवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून आठही जणांना सुखरूप वाचवले.

बुधवारी दुपारी कुलाबा येथील लाइटहाऊसजवळ समुद्रामध्ये ‘विनायक’ नौकेच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. नौकेच्या लाकडी फळ्यांमधीलनट-बोल्टच्याफटीतून (गॅपमधून) पाणी नौकेमध्ये शिरू लागले.याची माहिती मिळताचयलो गेट पोलिसांचे पथक ‘मुंबई नौका १५’ व एका खासगी बोटीसह घटनास्थळी पोहचले. निरीक्षक बनसोडे व त्यांच्या पथकाने क्षणाचाही विलंब न करता मदतकार्य सुरू केले आणि आठही जणांना सुखरूप वाचवले.