मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आज दोन तास बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक उद्या मंगळवारी दुपारी दोन तास बंद राहणार आहे. अमृतांजन पूल आणि खंडाळा बोगदा येथे गँट्री बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून घेतल्या जाणाऱया या ब्लॉकमुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प असणार आहे. त्यामुळे वाहनधारकांचा मोठा खोळंबा होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून तासाला हजारो वाहने

ये-जा करतात. सदरची वाहने वाऱयाच्या वेगाने धावत असल्याने मोठय़ा वारंवार अपघात होतात. त्या पार्श्वभूमीवर मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावणाऱया वाहनांवर वॉच ठेवता यावा, सदर वाहनांच्या नंबर प्लेटचा अचूक फोटो घेता यावा म्हणून एमएसआरडीसीकडून एक्स्प्रेस वेवर ठिकठिकाणी अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी एक्स्प्रेस वेच्या पुण्याच्या दिशेने जाणाऱया मार्गिकेवर कॅमेरे बसवण्यासाठी लोखंडी गँट्री उभारण्यात येणार आहे. त्याकरिता दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे.