स्पार्क गँगच्या एकाला अटक

224

गाडी बिघडली, नवा पार्ट टाकावा लागेल असा सांगून फसवणूक करणाऱया स्पार्क टोळीच्या एकाला वनराई पोलिसांनी अटक केली. कासीम खान असे त्याचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. तक्रारदार जानेवारी महिन्यात प्रवास करत होते. जयकोच जंक्शन येथे कासीमने तक्रारदाराची गाडी थांबवली. तुमच्या गाडीचा स्पार्क होतोय, काही प्रॉब्लेम दिसतोय असे सांगून बोनेट उघडायला लावले. त्या पार्टची किंमत नऊ हजार रुपये आणि मजुरी 350 रुपये घेऊ आणि सोबत बिलदेखील देऊ असे सांगून तक्रारदाराकडून पैसे घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक गीतेंद्र भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भरत घोणे, विजय भोसले, जाधव, मोरे यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी कासीमला शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या