
शेअर बाजारात गुरुवारी जोरदार पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 644 अंकांनी घसरून 80.951 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 203 अंकांनी घसरून 24,609 अंकांवर स्थिरावला. शेअर बाजाराच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस यासारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बुधवारी 420 अंकांनी शेअर बाजार वाढला होता. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती.