मुंबईसह ठाणे, नवी मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले, सखल भागात पाणी साचले

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले आहे. मंगळवारी दुपारी सुरू झालेला पाऊस अद्याप सुरू असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. विजांचा कडकडाट व मेघगर्जनांनी परतीच्या पावसाने मुंबईकरांची पुरती दाणादाण उडवली आहे. पाणी भरल्याने अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील 24 तासात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुसळधार पावसाने मध्य रेल्वेने सीएसएमटी ते ठाणे व सीएसएमटी ते वाशी दरम्यानची सेवा थांबविली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या