वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध हिंदी सिरीयल तसेच भोजपुरी सिनेमांमध्ये काम करणाऱया एका अभिनेत्रीला गुन्हे शाखेच्या युनीट-7 च्या पथकाने वेश्याव्यवसाय करताना रंगेहाथ पकडले. त्या अभिनेत्रीसोबत अन्य दोन तरुणी तसेच वेश्या दलाल महिलेस देखील पकडले.

वर्षा ही वेश्या दलाल असून ती हायप्रोफाईल सेक्स रॅकेटसाठी हिंदी सिरीयलमधल्या अभिनेत्रींचा वापर करीत असल्याची खबर युनीट-7 ला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक बनवून वर्षाला तीन तरुणी उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानुसार वर्षाने हिंदी सिरीयलमधील ती अभिनेत्री तसेच अन्य दोघी तरुणींना वेश्यागमनासाठी तयार केले. ठरल्यानुसार त्या तिघीही घाटकोपर येथील एका तीन स्टार हॉटेलमध्ये आल्या. तिथे पोलिसांनी छापा टाकून त्या तिघींना ताब्यात घेतले.