मुंबईत लसीकरणाला वेग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या तिसऱया लाटेला रोखायचे असेल तर जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. म्हणूनच मुंबईत ठिकठिकाणी लसीकरणाला वेग आला आहे.

चारकोप विधानसभा क्षेत्रात एकाच दिवशी तब्बल 3 हजार नागरिकांना लस टोचली. विभागप्रमुख सुधाकर सुर्वे व विभाग संघटक मनाली चौकीदार यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम राबवली. शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी या शिबिराला भेट दिली. यावेळी नगरसेविका शुभदा गुडेकर, उपविभागप्रमुख राजू खान, सुवर्णा प्रसादे, अभिषेक शिर्के आदी उपस्थित होते.

ईशान्य मुंबईतील गोवंडी येथेही विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांचे लसीकरण शिबीर घेण्यात आले. त्यात 15 हजार नागरिकांना लस देण्यात आली. यावेळी नगरसेवक विठ्ठल लोकरे, समीक्षा सक्रे, परमेश्वर कदम, उपविभागप्रमुख तात्या सारंग, प्रभाग समिती अध्यक्षा स्नेहल मोरे आदी उपस्थित होते.