
शरीर संबंधांना विरोध केल्याने हरयाणातील कैथल येथे दोन दिरांनी साथीदाराच्या मदतीने विधवा वहिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे.
हरियाणातील कैथल या गावात एक विधवा महिला रहात होती. तीन मुलांची आई असणारी विधवा महिला जानेवारी महिन्यात अचानक गायब झाली. त्यानंतर 20 मार्चला म्हणजे 40 दिवसांनंतर तिचे प्रेत गावातील तलावात सिमेंटच्या खांबाला लोखंडी साखळ्यांनी बांधलेल्या अवस्थेत सापडले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. तपसाअंती धक्कादायक सत्य समोर आले.
मृत महिलेच्या पतीचे निधन 2020 मध्ये झाले होते. तिच्या दिराला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. तो सतत तिला शरीर संबंधांसाठी गळ घालत होता, मात्र महिलेचा दिराच्या या मागणीला विरोध केला. याचा राग धरत दोन दिरांनी त्यांच्या साथीदारासह या महिलेची हत्या केली.
हत्येचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांनी सिमेंटच्या खांबाला बांधून तिचे प्रेत तलावात फेकून दिले. पोलिसांनी या घटनेबाबत दिरांसह त्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे.





















































