
माण तालुक्यातील पर्यंती येथील माय-लेकींच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांना यश आले असून, हा खून चोरीच्या उद्देशाने दागिने लुटण्यासाठी झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी मध्य प्रदेशमधील दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे. अवघ्या 72 तासांत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संदीप शेषमनी पटेल (वय 30, रा. परसिधी कारोल खुर्द, सिधी सिहवाल राज्य, मध्य प्रदेश), अजितकुमार रामकिशोर पटेल (वय 29, रा. परसिधी, सिधी सिहवाल, राज्य, मध्य प्रदेश) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
माण तालुक्यातील पर्यंती येथील संपताबाई लक्ष्मण नरळे (वय 75), नंदाबाई भिकू आटपाडकर (वय 58) या मायलेकींचा 20 डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञाताने गळा आवळून खून केल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, दहीवडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाचे आदेश दिले होते. माय-लेकीचे मध्यवस्तीत घर असतानाही हा खून झाल्याने माण तालुक्यात खळबळ उडाली होती.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस अधिकाऱयांनी हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. पोलीस पथकाने आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. मात्र, पोलिसांना ठोस माहिती मिळू शकली नाही. रविवारी (दि. 24) दुपारी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खास खबऱयामार्फत माहिती मिळाली की, परराज्यातील रहिवासी पर्यंती गावात राहत असून, ते जेसीबीचालक आहेत. त्या दोघांनीच मायलेकींचा खून केला आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दोघींच्या गळ्यातील दागिन्यांसाठी खून केल्याची कबुली दिली.
सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, अतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, अमोल माने, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, अमित माने, अविनाश चव्हाण, मोहन पवार, ओमकार यादव, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
बिडी-काडीतून ओळख अन् रेकी…
संशयित संदीप पटेल हा गेली सात कर्षे पर्यंती येथे कास्तक्यास आहे. तो तेथे जेसीबीचालक म्हणून काम करत होता. त्याला बिडी ओढण्याचे क्यसन होते. यातूनच त्याने माय-लेकीची ओळख केली होती. तो कारंकार त्यांच्या दुकानात बिडीखरेदीसाठी जात असे. माय-लेकी दोघीच असल्याने त्यांच्याकडे सोने, पैसा अडका असेल असा कयास त्याने बांधला. एकटय़ाला चोरी करणे शक्य नसल्याने त्याने औंध येथे केटर म्हणून काम करणाऱया मूळ मध्य प्रदेशातीलच अजितकुमार पटेल या त्याच्या साथीदाराला खुनाच्या अगोदर तीन दिकस बोलाकून घेतले. यातूनच त्यांचा प्लॅन शिजला होता.


























































