बामसेफच्या नेत्याची हत्या करणारा 24 तासांत गजाआड 

सोशल मीडियावर धार्मिक पोस्ट टाकल्याच्या वादातून  बामसेफच्या नेत्याची हत्या करून पळालेल्याच्या अवघ्या 24 तासात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने मुसक्या आवळल्या. भारत रावल उर्फ महाराज असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील तपासासाठी गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. वकील देवजीलाल महेश्वरी हे बामसेफचे नेते आहेत. ते सोशल मीडियावर धार्मिक पोस्ट अपलोड करायचे. त्याला भारतने विरोध केला होता. त्यावरून शुक्रवारी भारतने देवजीलालची चॉपरने वार करून हत्या केली. हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज वायरल झाले होते. जर मारेकऱयाला जर 24 तासात अटक केली नाही गुजरात बंदची हाक दिली होती.

मारेकरी हा मुंबईत येणार असल्याची माहिती युनिट 9 चे उप निरीक्षक विजयेंद्र आंबवडे यांना मिळाली. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक नंदपुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक संजीव गावडे, आशा कोरके, पोलीस शिपाई गवते यांच्या पथकाने तपास सुरु केला. पोलिसांनी मालाडच्या लिबर्टी गार्डन येथे सापळा रचला. सापळा रचून भारतला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली.

आपली प्रतिक्रिया द्या