CAA प्रकरणी मुस्लिम समाजाची दिशाभूल, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

नागरिकत्व कायदा हा चांगला कायदा आहे, परंतु या कायद्याप्रकरणी मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्यात आली असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तसेच कोरोना काळात केंद्र सरकारने चांगली कामगिरी बजावली असेही भागवत म्हणाले. दसर्याा निमित्त संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


दरवर्षी नागपूरच्या रेशीम बागेत संघाचा दसऱ्य़ा निमित्त वार्षिक कार्यक्रम असतो. यंदा हा कार्यक्रम महर्षी व्यास सभागृहात अवघ्या 50 स्वयंसेवकांच्या उपस्थितीत  हा कार्यक्रम पार पाडला.

यावेळी भागवत म्हणाले की “नागरिकत्व कायदा हा कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. परंतु ज्यांनी या कायद्याला विरोध केला त्यांनी मुस्लिम बांधवांना या कायद्यावरून दिशाभूल केली. त्याचा गैरफायदा घेऊन देशात हिंसाचार निर्माण केला असेही भागवत म्हणाले.
या कायद्यावर अजून चर्चा होणार होती पण नेमके कोरोनाचे संकट आले. त्यामुळे यावर चर्चा थांबली. आजही दंगलखोरांच्या मनात तो विषय सुरू आहे असे भागवत म्हणाले.


कोरोना काळात केंद्र सरकारने चांगली कामगिरी केली असे भागवत म्हणाले. संपूर्ण देशात कोरोनाचे सावट आहे. हा विषाणू घातक असला तरी त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण तितके कमी आहे. केंद्र सरकारने यात चांगली कामगिरी केली असेही भागव म्हणाले.
अनेक माध्यमांनी कोरोनाचे भडक वृत्तांकन केले असे भागवत म्हणाले. त्याचा एक फायदा असाही झाला की लोक कोरोनाला घाबरू लागले आणि अधिक काळजी करू लागले. आपण जुन्या गोष्टी नव्या समोर आल्या असेही भागवत म्हणाले. स्वच्छतेचे महत्त्व आपल्याला कळाले, घरातील अंगणात लावलेल्या झाडांचे महत्त्व आपलल्याला कळाले असेही भागवत म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या