फतेहपूर कारागृहातील कैदी जियाउल हसन याने राम मंदिरासाठी धनादेश पाठवला आहे. कारागृहात झाडलोट करून मिळालेली दीड महिन्याची कमाई त्याने राम मंदिरासाठी दिली आहे. जियाउल हसन याने केलेल्या विनंतीनंतर कारागृह प्रशासनाने त्याच्या कमाईचा धनादेश राम मंदिर ट्रस्टकडे पाठवला आहे. त्यासोबत हसन याचे पत्रसुद्धा आहे. 1075 रुपयांचा हा धनादेश आहे.
























































