
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थोड्याच वेळात शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात सुरू होणार आहे. या सोहळ्याला देश-विदेशातील बडे नेते, उद्योजक आणि महत्त्वाचे व्यक्ती सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता हा सोहळा सुरू होईल.
LIVE- निर्मला सीतारमण आणि सुषमा स्वराज यांचे मंत्रीपद कायम राहण्याची शक्यता
17 व्या लोकसभेमध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवलेल्या भाजप आणि मोदींची क्रेझ शपथोत्सवाच्या दिवशीही दिसून येत आहे. नवी दिल्लीमध्ये मोदींचे अनेक चाहते हजर झाले आहेत. हा ऐतिहासिक दिवस राजधानी दिल्लीमध्ये साजरा करण्यासाठी चाहते सज्ज आहेत. यात बिहारच्या मुझफ्फरपूर येथून आलेला एक अवलिया देखील आहे.
अमित शहांची मंत्रिमंडळात वर्णी, अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता
महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान
मोदींना पाठिंबा देण्यासाठी बिहारच्या मुझफ्फरपूर येथून अशोक नावाचा चाहता दिल्लात दाखल झाला आहे. अशोकने आपल्या शरिरावर तिरंगा रंगवला आहे आणि त्यावर मोदींचा चेहरा चितारला आहे. तसेच नमो, नमो असेही अक्षरात कोरले आहे. हा चाहता दिल्लीतील रस्त्यावर आणि संसदेबाहेर चहा विकून मोदींना पाठिंबा देत आहे.
Ashok, a resident of Muzaffarpur, Bihar is selling tea in Delhi to show his support for PM Modi, says,’ I sell tea in Muzaffarpur. I try to visit & sell tea wherever PM Modi holds a public meeting at. I will be selling tea until the ceremony, I will go back once it is over.’ pic.twitter.com/cdUEWu2ZIZ
— ANI (@ANI) May 30, 2019
अशोकला याबाबत विचारले असता तो म्हणाली की, ‘मी मुझफ्फरपूर येथे चहा विकण्याचा व्यवसाय करतो. पंतप्रधान मोदी जिथे जिथे जातात तिथे तिथे जाऊन मी देखील जातो आणि चहा विकण्याचा प्रयत्न करतो. शपथविधी सोहळ्यादरम्यानही मी चहा विकणार आहे आणि संपल्यानंतर पुन्हा घरी परतणार आहे.’
























































