अमित शहांची मंत्रिमंडळात वर्णी, अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे. शहा यांना अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनी शहा यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

याआधी दुर्धर आजारने ग्रस्त असणारे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याकडे हे खाते होते. त्यांनी यापूर्वीच मोदी यांना पत्र लिहून नव्या मंत्रिमंडळामध्ये आपला समावेश करू नका अशी विनंती केली होती. त्यामुळे हे खाते आता कोणाकडे जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु आता यावर शहा यांच्या नावाचे शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान

भाजप अध्यक्षपद कोणाकडे?
54 वर्षीय अमित शहा यांच्याकडे 2014 लोकसभा निडणुकीपूर्वी भाजप अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्य़ात आली होती. शहा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे 2014 ला बहुमताचे सरकार आले. तसेच 2019 ची निवडणूकही शहा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने लढली. या निवडणुकीतही भाजपने ऐतिहासिका कामगिरी करत विजय मिळवला. भाजपने एकट्याने 303 जागा मिळवल्या, तर एनडीएने 352 जागा मिळवल्या. आता शहा यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आल्याने भाजपाध्यक्षपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपाध्यक्षपदावर जेपी नड्डा यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे.