महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नरेंद्र मोदी आज 30 मे रोजी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यामध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मोदी दुसऱ्यांदा हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. मोदींसह काही मंत्रीही शपथ घेतली. बुधवार सायंकाळपासून मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान मिळणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर गुरुवारी दुपारच्या सुमारास हे चित्र अधिक स्पष्ट झाले.

सर्व लाईव्ह अपटेड – LIVE- रामदास आठवलेही घेणार मंत्रीपदाची शपथ

मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेल्या नेत्यांना गुरुवार सकाळपासून फोन सुरू झाले. मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील सात नेत्यांना स्थान मिळाले आहे. यात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, पियूष गोयल, अरविंद सावंत आणि संजय धोत्रे यांचा समावेश आहे. यातील गडकरी, जावडेकर, आठवले आणि गोयल यांनी याआधीही केंद्रामध्ये मंत्रीपद भूषवले आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत आणि अकोल्याचे खासदार संजय धोत्रे पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतील.