
हिंदुस्थानच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती नथालापती वेंकट रामन्ना यांची नियुक्ती होणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे 23 एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत. परंपरेनुसार बोबडे यांनी आपल्या पदाचे वारसदार म्हणून न्या. रामन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रीय कायदे मंत्रालयाला पाठवला आहे.
केंद्राने न्यायमूर्ती रामन्ना यांच्या नावाची सरन्यायाधीशपदी घोषणा केल्यास आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रथमच देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदावर बसणार आहेत. न्या. रामन्ना हे 26 ऑगस्ट 2022 ला सेवानिवृत्त होणार आहेत. म्हणजेच त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांहून कमी असेल. नोव्हेंबर 2019 मध्ये न्या. शरद बोबडे यांनी हिंदुस्थानचे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली होती.




























































