अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाचा तीन दिवसीय संप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

भुईकोट किल्ल्यासमोरील एमईएस एम्प्लॉईज युनियन एरिया पुणे येथे अहमदनगर शाखेच्या कार्यालयाबाहेर अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तीन दिवसीय संप पुकारला होता.

या आंदोलनात बी.बी. लोहार, एम.के. ठोंबरे, जे.डी. शिरसाठ, के.डी. वाघस्कर, के.बी. भिंगारदिवे, एस.एस. म्हस्के, एम.एस. ढगे, जी.सी. पाटील, आर.व्ही. भालसिंग, डी.एस. खडके, डी.टी. पांढरे, डी.आर. अनावडे, बी.एम. दळवी, के.एच. तुपे, एस.यु. अल्हाट, ए.डी. पाचारणे आदिंसह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.

नवीन भरती झालेल्या सर्व कामगारांना जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट करुन एनपीएस रद्द करावे, संरक्षण खात्याचे खाजगीकरण न करता तातडीने नवीन भरती करण्याची मागणी अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागण्यांसाठी सन 2004 पासून पाठपुरावा चालू आहे. संघटनेच्या वतीने वेळोवेळी या मागणीसाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला असून, सदर मागणीची दखल घेतली जात नसल्याने संप पुकारण्यात आल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.