प्लास्टिक वस्तु वापरणार्‍या दुकानदारांना 91 हजारांचा दंड

340

प्लास्टिक बंदी असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जातो. मनपाने दीड वर्षात सुमारे पावणेतीन लाखांचा दंड वसूल केला आहे. तथापि, मागील काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावली होती. आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वच्छता विभागाला प्लास्टिक बाळगल्या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार शुक्रवारी सलग दुसर्‍या दिवसशीही विक्रमी 91 हजारांची दंडवसुली करून 300 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

शासनाने प्लास्टिक बंदीचे आदेश दिल्यानंतर सर्वच महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्लास्टिक बंदीसाठी 2017 पासून प्रभावीपणे कारवाईला सुरुवात केली. सुरुवातीला ही कारवाई जोमात सुरू होती. शुक्रवारी स्वच्छता विभागाने पथक तयार करून शहरातील भिस्तबाग, सर्जेपुरा, दाळमंडई, आडते बाजार, चितळे रस्ता, गुरु माकेट, शुभम नमकीन, चिनी मेन्स वेअर, कोहिनूर क्लॉथ, शिव स्वीटस, शी प्लॅनेट, म्युनसिपल हडको, तारकपुर, एम.जी.रोड, आदी ठिकाणी कारवाई करुन पाच पाच हजारांचा दंड वसुल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या